Please enable JS

BLOG: The rise and fall of social media's usefulness

From the CEO's desk

The rise and fall of social media's usefulness

12th AUG 2022
The rise and fall of social media's reach

Hello Everyone!

Social media is used by politicians, businesses, and individuals. While other publicity methods require a lot of money, social media is an instant and free platform for everyone. This was true 10 years ago. Later, the social media users and content created by them kept increasing, therefore, to maintain the relevance of newsfeed, the social media algorithms had to filter out and prioritise content. This has dramatically decreased the organic reach of everyone, which makes many think that now social media is of no use. WhatsApp groups and forwards are also restricted in various ways.

Now the natural choice is paid social media ads and WhatsApp business API. Both are expensive. There is an alternative to these - adding another layer above social media to combine the strength of hundreds or millions of channel partners. Something like grid computing. Polipics ( www.polipics.in ) pioneered the idea of mass-personalized digital campaigning in 2016. While the idea looks simple, it took several years of R&D, practical implementations in different sectors, understanding user behaviour, and improvising the technology as well as methods to use it appropriately.

Today, 'social media experts' are found in every nook and corner of the city. They are piloting social media strategies of big companies and politicians with their limited understanding of social media algorithm, user behaviour, and their inability to see the future. These crash-course-manufactured experts are sure to burn money as well as crash the social media campaigns and therefore the future of their clients. After working closely with some of the biggest companies and political parties on the planet, we observed that they have mistaken social media campaigning as ‘the content’. They lack strong methods to take that content to the maximum of the targeted audience. We helped them reduce their marketing expense by 90% and increase their reach by 1000%, by applying Polipics in a fashion suitable to achieve their goals.

If you are a business with a network of channel partners or are a political party or government, write to info@polipics.in or WhatsApp to +91 9767288955 for free consultation. If our experts see the scope to apply Polipics, we will further offer you a tailor-made solution with 100% accuracy guarantee. We look forward to seeing your real rise on social media.

Thank you!

MORE BLOG TOPICS

सोशल मीडियाच्या उपयुक्ततेचा उदय आणि अस्त

१२ ऑगस्ट २०२२
The rise and fall of social media's reach

नमस्कार !

सोशल मीडियाचा वापर राजकारणी, व्यवसाय, व्यक्ती असे सर्वच जण प्रसिद्धीसाठी करतात. प्रसिद्धीची इतर माध्यमं खूप महाग असताना, सोशल मीडिया हे प्रत्येकासाठी झटपट आणि विनामूल्य व्यासपीठ आहे. हे 10 वर्षांपूर्वी खरे होते. नंतर, जसजसे सोशल मीडिया वापरकर्ते आणि त्यांनी पोस्ट केलेले कन्टेन्ट वाढत गेले, तसतशी न्यूजफीडची प्रासंगिकता टिकवून ठेवण्यासाठी, सोशल मीडिया अल्गोरिदमने कन्टेन्टची गाळणी आणि प्राधान्यक्रम ठरवायला सुरुवात केली. यामुळे सर्वांचा ऑरगॅनिक रीच (किती लोकांपर्यंत तुमच्या पोस्ट मोफत पोहोचतात त्याचे मोजमाप) कमालीचा कमी झाला. त्यामुळे आता सोशल मीडियाचा काही उपयोग नाही, असे अनेकांना वाटते. व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि फॉरवर्ड्सवरही विविध मार्गांनी निर्बंध घालण्यात आले आहेत.

आता नैसर्गिक निवड आहे - सशुल्क सोशल मीडिया जाहिराती (पेड कॅम्पेन) आणि व्हॉट्सॲप बिजनेस एपीआय. दोन्ही महाग आहेत. याला एक पर्याय आहे - शेकडो किंवा लाखो चॅनेल पार्टनर्सची ताकद एकत्र करण्यासाठी सोशल मीडियाच्या वर आणखी एक स्तर जोडणे. ग्रिड कम्प्युटिंग सारखे काहीतरी. पॉलिपिक्स ( www.polipics.in ) ने 2016 मध्ये मास-पर्सनलाइज्ड डिजिटल कॅम्पेनिंगची कल्पना पहिल्यांदाच प्रत्यक्षात आणली. ही कल्पना अगदी सोपी दिसत असली तरी, त्यासाठी अनेक वर्षे संशोधन आणि विकास, विविध क्षेत्रातील प्रत्यक्ष अंमलबजावणी, वापरकर्त्याचे वर्तन समजून घेणे, तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करणे व ते योग्यरित्या वापरण्याच्या पद्धती विकसित करण्यासाठी सातत्याने अनेक वर्षे परिश्रम घेण्यात आले.

आज शहराच्या कानाकोपऱ्यात ‘सोशल मीडिया एक्सपर्ट’ पाहायला मिळतात. सोशल मीडिया अल्गोरिदम आणि वापरकर्त्याचे वर्तन याबाबतचे त्यांचे मर्यादित आकलन तसेच भविष्य पाहण्याची त्यांची असमर्थता या (अव) गुणांसह ते मोठ्या कंपन्या आणि राजकारण्यांच्या सोशल मीडिया बाबतीतल्या रणनीती आखत आहेत. हे झटपट क्रॅश कोर्सद्वारे उत्पादित तज्ञ निश्चितपणे त्यांच्या ग्राहकांचे पैसे वाया घालवतील तसेच सोशल मीडिया कॅम्पेन सोबतच ग्राहकांचे भवितव्यदेखील क्रॅश करतील. पृथ्वीवरील काही सर्वांत मोठ्या कंपन्या आणि राजकीय पक्षांसोबत जवळून काम केल्यानंतर, आमच्या असे लक्षात आले कि त्यांनी सोशल मीडियाच्या प्रचाराला फक्त 'कन्टेन्ट' समजण्याची चूक केली आहे. ते कन्टेन्ट जास्तीत जास्त लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत नेण्यासाठी त्यांच्याकडे प्रभावी प्रचार पद्धतींचा अभाव आहे. आम्ही पॉलिपिक्स च्या मदतीने त्यांचा मार्केटिंग खर्च 90% कमी करण्यात आणि त्यांची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांची पोहोच (ऑरगॅनिक रीच) 1000% वाढविण्यात मदत केली.

जर तुम्ही चॅनेल पार्टनर्सच्या नेटवर्कद्वारे तुमचा व्यवसाय करत असाल किंवा तुम्ही राजकीय पक्ष किंवा सरकार असाल, तर विनामूल्य सल्ल्यासाठी info@polipics.in ला इमेल किंवा +91 9767288955 ला व्हॉट्सॲप करा. जर आमच्या तज्ञांना तुमच्या बाबतीत पॉलिपिक्स लागू करण्याची संधी दिसली, तर आम्ही तुम्हाला 100% अचूकतेच्या हमीसह सुयोग्य तंत्रज्ञान देऊ. सोशल मीडियावर तुमचा खरा उदय पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

धन्यवाद !

आणखी ब्लॉग्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा